न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल येथील जम्बो कोविड सेंटर, महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये, ऑटो क्लस्टर कोरोना रूग्णालयात २५ हजार पीपीई कीट आणि एन ९५ मास्क तसेच इतर साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.
निविदा प्रक्रीयेतील दुसऱ्या लघुत्तम निविदाधारकाकडून हे साहित्य थेट पद्धतीने खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी ८० लाख रुपये खर्च होणार आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये पिंपरीतील ओमनी हेल्थ केअर यांनी प्रति कीट ३२१ रुपये अधिक जीएसटी असा लघुत्तम दर सादर केला.
या निविदा प्रक्रियेमध्ये पात्र झालेले दुसरे लघुत्तम निविदाधारक सुपर प्लास्टीक कॉर्पोरेशन यांची निविदा स्वीकारली. त्यांच्याकडून प्राप्त निविदा लघुत्तम दर ३२१ रुपये अधिक जीएसटी प्रति किटप्रमाणे २५ हजार पीपीई किट नेट खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाख २५ हजार रुपये हे अधिक जीएसटी एवढा खर्च होणार आहे. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे.