न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शुक्रवार (दि. ७ ) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अटलबिहारी वाजपेयी योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीनकरिता अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजने अंतर्गत एका मुलींवर कुटुंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणा-या महिलांना २५ हजार रुपये, दोन मुलींवर कुटुंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणा-या महिलांना दहा हजार देण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ४२ लाभार्थी महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
यावेळी महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसदस्या स्वाती काटे, अश्विनी चिंचवडे, आशा धायगुडे-शेंडगे, माधवी राजापुरे, उषा ढोरे, अर्चना बारणे, आरती चौंधे, निर्मला कुटे, योगिता नागरगोजे, नगरसदस्य शितल शिंदे, स्वीकृत सदस्य बिभिषण चौधरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा शहरातील महिलांनी जास्तीत-जास्त लाभ घेऊन स्वावलंबी बनावे. या योजनांचा उद्देश शहरातील महिलांचे सबलीकरण, विकास व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे. त्याकरीता महिलांनी या योजनांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपला उत्कर्ष साधावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले.तर, सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.