सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) :- दिघी परिसरात सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्याचा प्रकार उघडकीस आला असून दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पिंपरी-चिंचवड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. ०४) सायंकाळी सुमारे ५.२५ वाजण्याच्या सुमारास दिघी येथील योगीराज चौकातून चाकण चौकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावेळी सुमारे ४० वर्षे व २७ वर्षे वयाच्या दोन महिलांनी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शब्द उच्चारून, डोळ्यांनी खुणा करून तसेच हातवारे करून अश्लील हावभाव केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याने पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत दोन्ही महिलांविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश सिताराम कारोटे (नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पिंपरी-चिंचवड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.












