- पोलिसासह सात जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- महिला आणि तिच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गणेश हेरिटेज, दापोडी येथे घडली.
रेल्वे पोलिस सरिता कैलास जाधव व कैलास जाधव, मिठी कैलास जाधव, विनायक मुलगंड, दिबोज्योती शहा, खन्ना, पगारे आणि इतर (सर्व रा. गणेश हेरिटेज, दापोडी) अशी आरोपींची नावे आहेत.
स्वाती दिलीप कदम (३४, रा. गणेश हेरिटेज, दापोडी) यांनी सोमवारी (दि. ४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्वाती कदम यांना गेल्या काही दिवसांपासून मारहाण व दमदाटी केली जात होती. ३० डिसेंबर रोजी फिर्यादी त्यांच्या गॅलरीत फोनवर बोलत असताना सरिता हिच्या मुलीने त्यांचा व्हिडिओ बनवला. फिर्यादी यांनी मुलीला रोखले असता आरोपी सरिता हिने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. कैलास याने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.