- अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- निगडी, चिखली परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी आणि दिघी परिसरातून एका कार चोरून नेली. संबंधित पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत लक्ष्मण पवार (५१. रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी निगडी येथील मधुकर पवळे पुलाखालून चोरट्यांनी चोरून नेली. दुचाकी चोरीच्या दुसऱ्या घटनेत जयपाल सोमनाथ भालेराव (२६, रा. तळवडे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भालेराव यांची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेट समोरून चोरून नेली. मुसा इस्माईल इनामदार (४८, रा. तापकीरनगर, देहूफाटा आळंदी) यांनी त्यांची मोटार चोरट्यांनी मोशी आळंदी रोडवरील साखरे महाराज मठाजवळून चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले.