- ग्राहकाला काचेच्या बाटलीने बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- हॉटलेमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला काचेच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. २२) रात्री आळंदी रोड, भोसरी येथील रुपाली बार येथे घडली. या प्रकरणी संतोष रामेश्वर पाटील (४९, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्या नुसार अमित सोनावणे (३०, रा. आळंदी रोड, भोसरी), पवन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र गणेश हांडे हे दोघेजण रुपाली बार येथे जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर फिर्यादी यांचा मित्र गणेश हांडे बिल मी भरतो, असे म्हणून काउंटरच्या दिशेने गेले. त्यावर आरोपीने अमित याने, तू मोठा जहागीरदार लागून गेला आहेस, असे म्हणून शिवीगाळी केली. त्यातून झालेल्या वादातून आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.