- प्रकल्पात एलआयजी व ईडब्ल्यूएस दोन्ही गटांसाठी घरांची निर्मिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर १२ येथील ईडब्ल्यूएसअंतर्गत घरांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या मंजुरी आणि देखरेख (सीएसएमसी) विभागाच्या वतीने त्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
या प्रकल्पात एलआयजी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही गटासाठी घरे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही गटासाठी लवकरच अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरण प्रशासनाकडून मिळाली.
प्राधिकरणाकडून सेक्टर १२ येथील पहिल्या टप्प्यात अल्प उत्पन्न गट (एलआयजी) अंतर्गत १ हजार ५६६ घरे उभारण्यात आले आहे. तर, आर्थिकदृष्टया दुर्बल गटाकरीता (ईडब्ल्यूएस) ३ हजार ३१७ घरे आहेत. सीएसएमसीच्या बैठकीत जानेवारीला त्यास मंजुरी मिळाली. १८ फेब्रुवारीला प्राधिकरणाला तसे कळविण्यात आले. दरम्यान, या दोन्ही गटासाठी आता प्राधिकरणाकडून अर्ज मागविण्याची तयारी सुरू केली आहे.