- तब्बल ०१,४५,००० च्या ०४ मोटारसायकली जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- जबरी चोरीतील फरार आरोपी त्याचे विधिसंघर्षीत बालक साथिदारासह पिपरी-चिंचवड, गुन्हे शाखा युनिट- ४ चे ताब्यात आले असून, यात वाहन चोरीचे ०४ गुन्हे उघड होऊन तब्बल एकुण ०१,४५,००० च्या ०४ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सांगवी पोलिस स्टेशन गु.र.क्र.२९८ /२०२० भा.द.वि. कलम ३९४ मधिल फरार असलेला एक सराईत गुन्हेगार हा त्याचे एका साथिदारासह भुमकर चौक येथे येणार असुन त्यांचेकडे एक चोरीची मोटारसायकल आहे. या बातमीच्या अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट -४ चे नमुद पथकाने भुमकर चौक येथे सापळा लावुन फरार आरोपी विशाल विश्वनाथ कांबळे वय- २५ वर्षे, रा – नाना काटे यांचे कार्यालय शेजारी, काटे नगर, रहाटणी यास त्याचा साथिदार एक विधिसंघर्षग्रस्त बालक, वय -१६ वर्षे, रा ब्दारका कॉलनी, बुद्धविहार समोर, पिंपळे सौदागर यास चोरीच्या एका मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
या आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे कसोशिने तपास केला असता त्याने व त्याचा ताब्यातील वि.सं. बालक साथिदार याचेसह मिळुन पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरात वाहन चोरीचे पिंपरी पोलीस ठाणे गु.र.नंबर -७३२ / २०२० भा.दं.वि.कलम -३७९, वाकड पोलीस ठाणे गु.र.नंबर- ८२२/२०२० भा.दं.वि.कलम -३७९, हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नंबर -१३८ / २०२० भा.दं.वि.कलम -३७९, कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नंबर- ४८/२०२१ भा.दं.वि.कलम -३७९ सदर आरोपीकडुन तपासादरम्यान ०१,४५,००० / – रु कि. च्या ०४ मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. यातिल आरोपी नामे विशाल कावळे हा रेकॉर्डवरिल गुन्हेगार असुन त्याचेविरुद्ध यापुर्वी दंगा व तोडफोड तसेच जबरी चोरीचे ०२ गुन्हे नोंद आहेत, अशी एकूण ०४ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.