- ‘मराठी राज्यभाषा दिन’ मनसे मोठ्या थाटामाटात साजरा करणार – सचिन चिखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी राज्यभाषा दिन; मराठी माणसाचा अभिमानाचा दिवस’ या संकल्पनेद्वारे विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहताना गर्दी न करता भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चौका-चौकात सह्यांची मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जे शिक्षक मराठी भाषा शिकवतात त्यांचा सत्कार, कला, क्रीडा, साहित्य व पत्रकार, तज्ञ मंडळी ज्यानी मराठी भाषेला नेहमीच अग्रगण्य समजले आहे, अशा मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे प्रभारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष गणेश आप्पा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये २७ फेब्रुवारी ते ३१ मार्च ऑनलाईन मराठी सह्यांची मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यामध्ये ज्याची सुंदर सही असेल, त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. आपली सुंदर अशी सही ९८२३०२३४४४ या व्हाट्सअप नंबरवर पाठवा व भरघोस बक्षिसे जिंका, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली.