- शनिवारी शहरातून चार दुचाक्या चोरीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- शहरात वाहन चोरीचे प्रकार सुरुच आहेत. अज्ञात वाहनचोरट्यांनी शहरातून चार दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन तर चिखली व सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा शनिवारी (दि. ३) दाखल केला आहे.
दुचाकी चोरीच्या पहिल्या गुन्ह्यात विकास अनंतराव बनसोडे (वय २३. रा. संत तुकाराम नगर , पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची दुचाकी २३ मार्च रोजी घराजवळ पार्क केली होती.
गणेश रामभाऊ राऊत (वय ३२, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राऊत यांनी त्यांची दुचाकी राहत्या घरासमोर २७ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास पार्क केली होती.
धनराज नामदेव सोनवणे (वय ५६, रा. राजे शिवाजीनगर, चिखली, मूळ रा. दमणार, ता. साक्री, जि. धुळे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची दुचाकी राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केली होती. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.
पिंटू नागोराव बदणे (वय ३४, रा. नवी सांगवी) यांनी शनिवारी (दि. ३) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची दुचाकी राजीव गांधी पूल, सांगवी येथे रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २९ मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते ३० मार्च रोजी सकाळी रात्री साडेनऊया कालावधीत घडला.