न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२१) :- शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या ( एम.एच.०४ एफ यु ०१९१ ) या कंटेनरची राजगुरूनगर बाजूकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक बसल्याने स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला आणि सिग्नलला उभ्या असलेल्या सिलेंरो कारला भरधाव स्कॉर्पिओ गाडीचा अत्यंत वेगाने जोराची धडक बसली.
या भीषण अपघातात तीन युवकांचा जागेवरच अंत झाला. तर स्कॉर्पिओ गाडीतील दोन जण जखमी झाले आहेत. यातील दोन युवक सख्खे चुलत भाऊ असून वाकी बुद्रुक व एक जण कडूस ( ता.खेड ) येथील आहेत. याप्रकरणी उशिरापर्यंत चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
प्रफुल्ल संपत सोनवणे ( वय.२७ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अक्षय मारुती सोनवणे ( वय.२३ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अविनाश रोहिदास अरगडे ( वय.२८ वर्षे,रा.कडूस,ता.खेड ) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. यातील अक्षय सोनवणे यांचा अपघात झालेल्या तळेगाव चौकात वेदिका चाय या नावाने हॉटेल व्यवसाय होता.