न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- महाराष्ट्रातील १० मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सांगोल्यातील बादलवाडी येथील मतदान केंद्रावर एका व्यक्तीने ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला. टीव्ही ९ मराठीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
एक मराठा, लाख मराठा घोषणा देत मशीन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून पोलिसांच्या हवाली केले आहे.