- मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या पूजेला येण्याचं टाळाव – बंडातात्या कराडकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा पार पडणार आहे. या पूजेला व्यसनमुक्ती युवक संघाचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांनी विरोध दर्शवला आहे.
बंडातात्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून पांडुरंगाच्या पूजेला येण्याचं टाळावे. ज्या पद्धतीने गेले चार महिने वारकऱ्यांचे आंदोलन गुंडाळण्यात आले, त्यावरुन महाराष्ट्रात भगव्या झेंड्याच राज्य आहे, असे वाटत नाही.
भगव्या झेंड्याचा अपमान सुरु असून, वारकऱ्यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात. वारकऱ्यांच्या पोशाखात चालू नका असा पोलीस दम देतात. दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे आपण रद्द केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही, असेही बंडातात्या म्हणाले.