- उपशहरप्रमुख हरेश नखातेंच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारचा निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- शहर शिवसेनेच्या वतीने वाढत्या इंधन दरवाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारचा ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन करण्यात आले. उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या नेतृत्वाखाली काळेवाडी येथील पेट्रोल पंपावर हे अनोखे आंदोलन पार पडले. पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गुलाबपुष्प देऊन हे आंदोलन करण्यात आले. तसेच मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, अल्पसख्यांक शहरप्रमुख हाजी दस्तगीर मनियार, उपशहरप्रमुख हरेश नखाते, सुधाकर नलावडे, मातोश्री संस्था अध्यक्ष गणेश आहेर, प्रहार संघटनेचे संजय गायके, विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदीप दळवी .अंकुश कोळेकर, गणेश वायभट, सावता महापुरे, नरसिंग माने व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सामान्य नागरिकांनीही या इंधन दरवाढीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
उपशहरप्रमुख हरेश नखाते म्हणाले की, देशात कोविड-१९ च्या संर्सगाची स्थिती आहे. लॉकडाउन व आजाराने त्रस्त असलेली जनता निराश झाली आहे. आर्थिक चक्र मंदावले आहे. पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट समोर ठाकले आहे. जनतेला रोजगार नाही, कुटुंब कसे चालवावे, याची चिंता आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाने जनतेला दिलासा देणारे निर्णय न घेता उलट महागाईचा भडका उठवत आहे. देशाचा कारभार चालविण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा दावा नखाते यांनी यावेळी केला.