- एकूण २८८ रूग्णांपैकी केवळ ३५ जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. म्युकर मायकोसिस रुग्णांपैकी ५० टक्के मृत्यूचे प्रमाण असते, असे जागतिक पातळीवरील संशोधनातील निष्कर्ष आहे.
आजवर पिपरी चिंचवड शहरात एकूण २८८ रुग्ण आढळून आले. मात्र, शहरात उपचार असलेल्या केवळ ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. १२५ रुग्ण उपचार घेत असून, १२८ रुग्ण म्युकरमायकोसिस मुक्त झाले आहेत.
म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात कमी असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. कोरोनानंतर पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहे. एप्रिलपासून रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राजेश पाटील यांनी महापालिकेच्या यशवंराव चव्हाण रुग्णालयात स्वतंत्र विभाग सुरू केला.