- केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंना चांगलंच भोवलं आहे. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून नेण्यात आलं.
नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. अखेर पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.