- दिघी व तळवडेतील घटना; चोरट्यांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- दुचाकीस्वार अनोळखी चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेल्याच्या दोन घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी दिघी आणि चिखली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २३) गुन्हे दाखल करण्यात आले.
वडमुखवाडी येथे बालाजी मंदिरासमोरील रस्त्यावर जॉगिंग करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी भगवान श्रीरंग नाईक (वय ३४, रा. दिघी) यांच्या हातातील मोबाईल जबरदस्ती काढून नेला. १२ मार्चला सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्रिवेणीनगर चौकाजवळील तळवडे रोडवरून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी सुजाता काळू सांगळे (वय २५, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. १७ ऑगस्टला सकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.