- राज्य शासनाच्या गृह विभागाकडून आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर, पश्चिम विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे शहर, दक्षिण विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आली आहे.
तर, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याकडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे मुख्यालय तसेच गुन्हे शाखेची जबाबदारी होती. त्यांना बढती देण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे त्यांची बढतीने बदली करण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची बढती व बदलीचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी (दि. २३) तसे आदेश काढले आहेत.