- मृतदेह कुजलेल्या अवस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- किवळे येथील पवना नदी परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत शेतातील एका झाडाला कापडाच्या साह्याने एका ३० ते ३५ वर्षे वयाच्या पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे.
खासगी रोपवाटिका चालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने चार ते पाच दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. तरुण रंगाने काळा सावळा असून, अंगात टीशर्ट व काळी पॅन्ट त्याने परिधान केली होती. याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.