- ऑनलाईन यादीत निवड झालेल्या उमेदवारांची करीत होते फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- मुलाला सैन्य दलात भरती करतो, असे सांगुन फिर्यादीच्या मुलाची मुळ कागदपत्र घेवुन फसवणुक केली. याबबत निगडी पोलीस ठाण्यात संभाजी शिवाजी विरकर (वय ४० वर्ष, रा. महादेवनगर, इस्लामपुर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी तक्रार दिली आहे.
यपोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून शैक्षणिक मुळ कागदपत्रांसह इतर १० मुलांचे मुळ कागदपत्रे तसेच इतर ०७ मुलांचे बनावट कॉल लेटर, २०० रुपयांचा मिल्ट्रीचा हाफ शर्ट, कॅप, बेल्ट, फित तसेच ०४ मोबाईल फोन अशा वस्तु जप्त केल्या आहेत.
प्रविण जगन्नाथ पाटील (वय २५ वर्ष, रा. अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली), महेश सुरेश वैद्य (वय २७ वर्ष, रा. घर नं १६१, सरगम कॉलनी, कर्वेनगर, पुणे, मुळगाव मु. उपळाई, पो. (ठोंगे) ता. बार्शी, जि. सोलापुर), अनिल रामदास उर्फ चव्हाण (वय ३५ वर्ष, रा. औटीनगर, जय भवानी रोड, नाशिक, मुळगाव उजनी, सिन्नर, जी. नाशिक), तुषाल उर्फ तुषार कैलास डुकरे (वय २५ वर्ष, सावतामाळी नगर, रामलिंग रोड शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी सैन्य किंवा पोलीस भरतीतील वैद्यकिय तपासणी परीक्षेत पास करुन देतो, असे सांगुन उमेदवाराची मुळ कागदपत्रे जमा करुन घेत होते. काही आगावू रक्कम अडव्हॉन्स म्हणुन स्विकारली जात असे. उमेदवार स्वतःची मेहनत, कौशल्य, बुद्धीमत्ता यांच्या जोरावर परीक्षा उत्तीर्ण होत. त्यावेळी त्या उमेदवाराचे ऑनलाईन यादीत नाव पाहुन सिलेक्शन आम्ही केल्याचे भासवीत होते. तसेच त्यांच्याकडून पैसे उकळीत होते. निगडी पोलीस तपास करीत आहेत.