- ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी नमुने रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत जोखमीच्या नायजेरिया देशातून आलेले दोन जण करोनाबाधित आढळले आहेत. या प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. हे प्रवासी करोनाबाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे, असे ११ देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये बाधित आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहेत.
जे प्रवासी बाधित आढळणार नाहीत त्यांचेही विलगीकरण केले जाणार आहे. सात दिवसानंतर पुन्हा आरटीपीसआर चाचणी केली जाईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
















