न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- भाजपा कायदा आघाडी व सी ए आघाडीतर्फे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठ वकील आणि सीए यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नागरिकांना कायदाविषयक तसेच आर्थिक व्यवहारांबद्दलच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत मिळावी याकरिता मोफत विधी सेवा सल्ला केंद्र आणि सीए सल्ला केंद्र स्थापन करण्यात आले.
हा कार्यक्रम आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सत्कारार्थीना शुभेच्छा दिल्या. यावेळी जीवन गौरव पुरस्कार अॅड. सुधाकरराव आव्हाड, अॅड. हर्षद निंबाळकर, सीए मिलींद काळे, तुकाराम गुजर, उमेश चांडगुडे यांना देण्यात आला. विधी सीए, उद्योग भूषण पुरस्कार सीए दिपक सांगला (आयएएस), अॅड. सुभाष मोहिते, अॅड. सुनिल होनराव, अॅड. संजय भळगट, अॅड. एसव्ही कोळसे पाटील, आत्मराम भापकर, सीए किशोर गुजर, सीए संतोष जाधव, सीए आशिष बाहेती यांना देण्यात आला.
विधीज्ञ व सीए नारीशक्ती पुरस्कार अॅड. जयश्री कुटे, अॅड. सुजाता बिडकर, सीए. रचना रानडे, सीए. प्राजक्ता चिंचोळकर, अॅड. ज्योती सोरकडे, अॅड. विभा सिंग, अॅड. जया उभे तसेच वृक्ष संवर्धन पुरस्कार हभप शिवाजी महाराज मोरे (माजी अध्यक्ष देहु संस्थान), गोरक्षा पुरस्कार सुभाष काटे यांना आमदार शंकर जगताप, भाजपा कायदा आघाडी अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ व सीए आघाडी अध्यक्ष बबन डांगले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास भाजपचे शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश प्रभारी कायदा आघाडी अॅड. धमेंद्र खांडरे, सदाशिव खाडे, माजी उपमहापौर झामाताई बारणे, सरचिटणीस नामदेव ढाके, सरचिटणीस विलास मडिगिरी, अॅड. सुभाष चिंचवडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही आघाड्यांचे पदाधिकारी अॅड. गोरख कुंभार, अॅड. प्रशांत भागवत, सीए शैलेश बोरे, अॅड. मंगेश लाहोरे, अॅड. रूपाली वाघेरे, अॅड. संदिप तापकीर, सीए विनोद इनामदार, सीए विजयकुमार बामणे, सीएअमोल इंगळे, सीए सारिका चोरडिया, अॅड. सोपान पाटील, अॅड. अजितकुमार जाधव, अॅड. दिनकर शिंदे, सीए हिमगौरी कुमावत, अॅड. परेश नारूटे, अॅड. पूनम स्वामी प्रधान, अॅड. विश्वेश्वर काळजे, अॅड. महेश गोसावी, अॅड. संदीप सेंदणकर, अॅड. विठ्ठल सोनार यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अॅड. पल्लवी विघ्ने व अॅड. शोभा कदम यांनी केले.












