न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य कर्मचारी काम करतात. त्यातील एएनएम आणि जीएनएम पदावरील कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यापासून पगार झालेला नाही.
हे कर्मचारी विनावेतन काम करीत आहेत. सरकारला त्याचे काहीच गांभीर्य नसल्यामुळे काळया फीती लावून या कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.












