न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- पिंपळे निलख-विशालनगर येथे आयटी कंपनी मधील इंजिनीयर व कर्मचारी, संरक्षण श्रेत्रातील निवृत्त अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती राहत असून पिंपळे निलख येथील ग्रामस्थ हे शांतताप्रिय व धार्मिक वृत्तीचे असून व सदर गाव शहराचे मुख्य भागातील लष्करी परिक्षेत्राला लागून असल्याचे व गावाचा होत असलेला झपाट्याने विकास या अनुषगाने प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील महत्त्वपुर्ण अशा पिपळे निलख परिसरामध्ये पाहणी करून सांगवी पोलिस स्टेशन अंतर्गत नविन पोलीस चौकी उभारून गावातील महिला, जेष्ठ नागरिक, मुली, विद्यार्थी व ग्रामस्थांना दिलासा दयावा. असा विनंती अर्ज रविराज काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात केला होता.
त्यानुसार सहायक पोलीस महानिरीक्षक (नि.व.स) पोलीस महासंचालक यांनी 23/01/2025 रोजी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. निवेदनाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यास कळवले होते. परंतु, आज दोन महिने उलटून सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून झाली नाही. त्यामुळे पिंपळे निलख – विशालनगर मधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करावी अन्यथा 1 मे 2025 रोजी पासून पिंपळे निलख येथील मुख्य बस स्थानक येथे सकाळी 11:00 वाजता आमरण उपोषणास बसणार आहे, असे आपचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले. गावातील नागरिकांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.











