न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संघटनेच्या नवीन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील १४ मंडलांसाठी नवीन अध्यक्षांची निवड रविवारी जाहीर करण्यात आली आहे.
आमदार शंकर जगताप यांनी विधानसभा निहाय आयोजित कार्यक्रमांमध्ये नवनियुक्त मंडल अध्यक्षांची नावे जाहीर केली. प्राथमिक सदस्य, सक्रिय सदस्य, बूथ कमिटी यानंतर संघटन पर्वाच्या तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ :- मोहन राऊत (रावेत – वाल्हेकरवाडी), हर्षद नढे (चिंचवड काळेवाडी), सनी बारणे (थेरगाव – वाकड), सोमनाथ तापकीर (रहाटणी – पिंपळे सौदागर), गणेश ढोरे (सांगवी – पिंपळे गुरव).
पिंपरी विधानसभा मतदारसंघ :- जयदीप खापरे (प्राधिकरण – चिंचवड), धरम वाघमारे (आकुर्डी गाव- शाहूनगर), मंगेश धाडगे (संत तुकाराम नगर – खराळवाडी – कासारवाडी), अनिता वाळुंजकर (फुगेवाडी-दापोडी-बोपखेल).
भोसरी विधानसभा मतदारसंघ :- ऍड. योगेश सोनवणे (चिखली – कृष्णानगर),.रामदास कुटे (तळवडे – यमुनानगर), अजित बुर्डे (मोशी – चऱ्होली), अमोल डोळस (दिघी – गवळीनगर – गव्हाणे वस्ती), शिवराज सुदाम लांडगे (धावडे वस्ती – इंद्रायणीनगर – नेहरूनगर) यांची मंडल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.











