न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२५) :- चिंचवड स्टेशन येथील आनंद नगर झोपडपट्टीत गुरूवारी दुपारच्या सुमारास महिला शौचालयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घराचे नुकसान झाले असून, परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण पसरलआहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने तातडीने दाखल झाली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. महिलांनी आणि लहान मुलांनी आरडाओरड सुरू केली होती. आगीचे कारण अद्याप कळू शकते नाही.














