न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगारदिनी संयुक्त महाराष्ट्रास ६५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आयोजित, ‘महाराष्ट्र गौरव रथयात्रा’ चे बुधवारी आगमन होत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यातील प्रातिनिधीक स्वरूपात काही हुतात्म्यांची रथयात्रेच्या माध्यमातुन हुबेहूब वेशभूषा प्रधान करणार आहे व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून जाज्वल्यरुपी ऐतिहासिक क्षणांच्या स्मरणार्थ आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, या अनुषंगाने या संकल्पनेचे सादरीकरण करून संदेश देण्यात येणार आहे.
या रॅली व रथ यात्रेचे मार्गक्रमण पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, नागरी वस्तींमधून असणार आहे. सकाळी :- १०:०० वा. फिरंगाई माता मंदिर, दापोडी, पुणे, सकाळी :- १०:३० वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लांडेवाडी, भोसरी. नेहरुनगर मार्गे- दुपारी:- ११:३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी, पुणे. दुपारी :- १२:०० वाजता, पिपरी साई चौक- एम.एस.ई.बी. चौक, दुपारी :- १२:१५ वाजता नव महाराष्ट्र विद्यालय – छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंपरी गाव- गणेश हॉटेल जय हिंद स्कूल –तपोवन मंदिर रोड दुपारी :- १२:३० काळेवाडी पाचपीर चौक- काळेवाडी- एमजीएम स्कूल-चिंचवडगाव- मोरया हॉस्पिटल चौक. दुपारी :- ०१:०० चिंचवडगाव चाफेकर चौक- वाल्हेकर वाडी- शुभम गार्डन-उजवीकडे- स्पाईन रोड- भेळ चौक- दुपारी :- ०२:०० भक्ती शक्ती चौक- समारोप होईल.
या रथयात्रा व रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे तसेच शहराध्यक्ष योगेश बहल तसेच शहरातील आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.











