न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पुण्यश्लोक अहल्यादेवी जयंती साजरी केली जाते. मात्र, पालिकेच्या निधीतून एका खासगी संस्थेकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन गेल्या ५ वर्षांपासून केले जात आहे. त्या संस्थेच्या अध्यक्षा भाजप नगरसेविका आहेत. याप्रकरणाची चौकशी करून, संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र, सामाजिक संघटनेने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आहिल्यादेवी यांच्या जयंतीवर महापालिकेकडून होणाऱ्या खर्चाबाबत शंका उपस्थित करून, जयंती कार्यक्रमाला एकप्रकारे विरोधच केला आहे. साने यांनी शहरातील धनगर बांधवांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनांनी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाने केली होती.
याबाबत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रक काढून खुलासा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ धनगर समाज्याच्या नसून तमाम भारतात राहणा-या सर्व समाज बांधवाच्या आदर्श माता आहेत. तर आमची पूर्वीपासूनची मागणी की, इतर थोर महापुरषाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात यावी.
काल वर्तमानपत्रात जी बातमी आली होती. त्यात जी नावे होती. त्यातील रासप शहर अध्यक्ष भरत महानवर, अहिल्यादेवी प्रतिष्ठान गणेश पाडोळे अहिल्यादेवी होळकर समिती यांनी मला पत्राव्दारे काहींनी फोनव्दारे मला सांगितले की माझा या बातमीशी काही संबंध नाही. आम्ही समाज्याच्या पाठीशी आहोत. यांचे माझेकडे पुरावे आहेत.
जो माझ्यावरती राजकीय आरोप करण्यात आला त्याला माझ उत्तर अस आहे की, माझा विरोध जयंतीला नाही तर जयंतीनिमित्त झालेल्या गैरव्यवहाराला आहे. हा माझाच नव्हे तर सकल धनगर समाजाचा आरोप आहे. दोन वर्षापासून सकल धनगर समाज पालिकेच्यावतीने करण्यात येणा-या जयंतीत न सहभागी होता. दुसरी जयंती साजरी करतो. तर त्याही मंडळाला पालिकेने मदत करुन तोही कार्यक्रम देखण्या स्वरुपाचा होण्यासाठी त्याही मंडळाला मदत करावी व जयंतीतल्या गैरव्यवहाराची संपूर्ण माहीती मला त्या समाजाच्या घटक वर्गाने दिली. त्यांचे माझ्याकडे पत्र आहे व तसेच गैरव्यवहराचे पुरावे आहे. तरी येणा-या जयंतीत गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि मागील जयंतीत गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, असे साने यांनी या पत्रात म्हटले आहे.











