न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- महापौर राहुल जाधव यांनी आज बुधवार (दि. २२) रोजी प्रभागातील डी. पी. रस्त्यांची पाहणी केली. त्यामध्ये सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन डी. पी. प्लॅन दाखून पुढील कामे संबधित अधिकाऱ्यांना करण्यास सांगितले.
यावेळी त्यांनी प्रभागातील वडाचा मळा ते सिल्वर जिम १२ मी, सिल्वर जिम ते देहू आळंदी रस्ता १८ मी, रवीरंजन काटा ते इंद्रायणी नदी २४ मी, शिव रस्ता ते वडाचा मळा ३० मी इत्यादी डी. पी. रस्त्यांची पाहणी केली व येत्या आठवडाभरात कामे चालू करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी त्यांच्याबरोबर महापालिका अधिकारी, शेतकरी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


















