न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारी वृत्तीस आळा घालणेकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे व अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले होते. आदेशास अनुसरुन परिमंडळ तीन कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनकडील २१ सराईत गुन्हेगारांना एप्रिल २०२५ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५, ५६ व ५७ प्रमाणे हद्दपार करण्यात आले आहे.
सर्व तडीपार इसम/महिला हे २० ते ५५ वयोगटातील सराईत गुन्हेगार आहेत. मार्च २०२५ मध्ये ०७ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे, तसेच एप्रिल २०२५ मध्ये वरीलप्रमाणे एकूण १७ हद्दपार आदेश पारीत करण्यात आले आहेत, त्यामध्ये एकूण २१ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच परिमंडळ तीन पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील १०० हुन अधिक गुन्हेगारांचे हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करणार आहोत.
दिघी पोलीस ठाण्यातून हनुमंत नामदेव भोसले, वय ३५ वर्षे, रा. च-होली (बु), ता. हवेली, जि. पुणे. (महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये ०१ गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्ह्यांमध्ये मा. न्यायदंडाधिकारी साो, खडकी, पुणे यांनी आरोपीस सिद्धपराध ठरविले आहे.) या सराईत गुन्हेगाराला ०३ महिने, नियोजीत तडीपार महिला नामे निर्जला गणेश कुंभार, वय २२ वर्षे, रा. सावतामाळी नगर, तीन मजली बंगला, डुडुळगाव, ता. हवेली, जि. पुणे. (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत) हिस ०१ वर्षाकरीता. सुपडा काशीराम सुर्यवंशी, वय ५५ वर्षे, रा. तांबे बिल्डिंग, भारतमाता नगर, दिघी, ता. हवेली, जि. पुणे. (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत) ०२ वर्षाकरीता, पंढरीनाथ सुभाष सुर्यवंशी ऊर्फ पाटील, वय ४७ वर्षे, रा. भारतमाता नगर, दिघी ता. हवेली, जि. पुणे पुणे (महाराष्ट्र महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम कलमांन्वये तसेच भा.दं.वि. अधिनियमान्वये कलमांतर्गत एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत) ०२ वर्षाकरीता, १) सुशांत दिपक भोसले, वय २२ वर्षे, रा. आप्पा पान शॉप समोर, यादव यांचे खोलीत भाड्याने माऊलीनगर, साई पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याला दिघी, ता. हवेली, जि. पुणे २) धनंजय आकाश दुनगाव, वय २९ वर्षे, रा. आदर्शनगर, सर्व्हे नं. ७२ दत्तकॉलनी, दिघी ता. हवेली, जि. पुणे (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीररित्या विनापरवाना देशी दारुच्या बाटल्या जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत.) ०१ वर्षाकरीता
चिखली पोलीस ठाण्यातून बुद्धभुषण उर्फ बुध्या माणीक पालके, वय २३ वर्षे, रा. यशवंत कॉलनी, मोरेवस्ती, चिखली, पुणे. (चोरी, दरोडा, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत करणे, आगळीक करणे, बलात्कार करणे, धाकधपटशा करणे, शांतता भंग घडवुन आणणे, घातक हत्यारासह दहशत माजवणे व मनाई आदेशाचा भंग करणे यासारखे एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत) या गुन्हेगाराला ०२ वर्षाकरीता, सुमित ऊर्फ सुम्या विलास क्षिरसागर, वय २० वर्षे, रा. ताराबाई चौक शिवकृपा कॉलनी, मोरेवस्ती, चिखली, पुणे. (खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, खंडणी, जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा घालणे, आगळीक करणे, घातक हत्यारासह दहशत माजवणे, मनाई आदेशाचा भंग करणे, संघटीत गुन्हेगारी करणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत) यास ०२ वर्षाकरीता, आदर्श उर्फ डपक्या गौतम खंदारे, वय २० वर्षे, रा. ओमकार नगर कॉलनी नं. ७, जाधववाडी, चिखली, पुणे. (खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत पोचवणे, नुकसान करुन आगळीक करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत पोचवणे, घातक हत्यारासह दहशत माजवणे, मनाई आदेशाचा भंग करणे इत्यादी यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.) ०२ वर्षाकरीता, प्रतिक बंडु शेलार, वय २४ वर्षे, रा. भिमशक्तीनगर, झोपडपट्टी, मोरेवस्ती, चिखली, पुणे. (खंडणी वगैरेकरीता अपहरण, गैरपरिरोध, इच्छापुर्वक दुखापत, शांतताभंग घडवुन आणण्याचे उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचा भंग करणे, महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत.) ०२ वर्षाकरीता
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातून नितीन सखाराम तांबे, वय ४१ वर्षे, रा. अहिरे, ता. खेड, जि. पुणे. (शांतताभंग घडवुन आणणे, धाकधपटशा, दुखापत करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे इत्यादी यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत)
०१ वर्षाकरीता, १) अतुल बाळासाहेब चौधरी, वय २८ वर्षे, खालुंब्रे, ता. खेड, जि पुणे (टोळी प्रमुख) २) स्वप्नील बाळासाहेब चौधरी, वय २५ वर्षे, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे (टोळी सदस्य) (चोरी, दुखापत, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे, शांतताभंग घडवुन आणणे, घातक हत्यार सोबत बाळगुन दहशत माजवणे, गैर निरोधाबद्दल शिक्षा, फौजदारीपात्र धाकधपटशा इत्यादी टोळी प्रमुख व टोळी संदस्य यांचेवर यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत) ०१ वर्षाकरीता, १) आकाश बाळासाहेब शेळके, वय २८ वर्षे, रा. कोरेगाव, ता. खेड, जि. पुणे. (टोळी प्रमुख) २) नारायण सुनिल घावटे, वय २४ वर्षे, रा. शेलु, ता. खेड, जि. पुणे. (टोळी सदस्य) ३) गणेश हिरामण लिंबोरे, वय २४ वर्षे, रा. शेलु ता. खेड, जि. पुणे. (खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोचवणे, दरोडा, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासंहित जबरी चोरी किंवा दरोडा, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत याची भीती घालणे, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी, घातक हत्यार सोबत बाळगुन दहशत माजवणे, मनाई आदेशाचा भंग करणे यासारखे टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत.) ०२ वर्षाकरीता,
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातून अभिजीत ऊर्फ धीरज विलास निटुरे, वय २८ वर्षे, रा. शांतीनगर कॉलनी नं. २, निटुरे निवास, लांडेवाडी, भोसरी, पुणे. (स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, चोरुन पठलाग करणे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन प्रतिबंध अधिनियमान्वये कलमांतर्गत गुन्ह्यांमध्ये मा. विशेष न्यायालय), ०१ वर्षाकरीता,
चाकण पोलीस ठाण्यातून अजय ऊर्फ विजय दगडू पवार वय २० वर्षे, रा. वाघेवस्ती चाकण, ता. खेड जि. पुणे (दरवडा घालण्याची पुर्वतयारी करणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, यासारखे एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत.) ०२ वर्षाकरीता, आकाश संजय तिकोणे, वय ३० वर्षे, रा. नाणेकरवाडी, ज्योतीबा मंदिराजवळ, ता. खेड जि. पुणे. (खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने परावृत्त करणे तसेच दुखापत पोचवणे, गैर निरोध शिक्षा, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोचवणे, प्राणघातक हत्यारासह बेकायदेशीर जमावात सामील होणे, आगळीक करणे, घातक हत्यार जवळ बाळगुन दहशत माजवणे इत्यादी यासारखे एकूण ०३ गुन्हें दाखल आहेत.) ०२ वर्षाकरीता, तुषार ऊर्फ गोल्या रामराव राठोड, वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०२, डी. विंग, द्वारका स्क्वेअर सोसायटी, चहोली फाटा, ता. हवेली, जि. पुणे (दुखापत पोचवणे, खून करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करुन नंतर गृहअतिक्रमण करणे, अपप्रेरणा (चिथावणी) देणे, मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी गृह अतिक्रमण करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे इत्यादी-यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.) ०२ वर्षाकरीता, ओंकार ऊर्फ मोन्या नवनाथ पहऱ्हाड वय २० वर्षे रा. काळुसरोड, तुकाईनगर, भोसे, ता. खेड जि. पुणे (चोरुन पाठलाग करणे, शांतताभंग घडवुन आणणे, धाकधपटशा करणे, बलादग्रहण व त्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत याची भिती घालणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गैर निरोध शिक्षा, मनाई आदेशाचा भंग करणे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन प्रतिबंध अधिनियमान्वये यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.) ०२ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहेत.
वरीलप्रमाणे हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाणेस संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत पोलिसांनी नागरीकांना आवाहन केले आहे.












