- भोसरीतील गोडाऊन चौकातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२५) :- भाजीवाल्याकडुन कोथंबीर घेवुन येत असताना पायी जाणाऱ्या सहा वर्षीय ऋषीकेशला जेसीबी चालकाने धडक देत गंभीर जखमी केले. तो त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे.
हा प्रकार (दि.०४) रोजी सकाळी ११.३० वा. चे दरम्यान म.न.पा पिं.चिं सुलभ शौचालय समोर, गोडावुन चौक, मोशी येथे मोकळया जागेत घडला.
३८ वर्षीय महिलेने आरोपी राहुल श्रीरामचंद्र यादव (वय २६ वर्षे, धंदा-जे.सी.बी चालक, रा. मोहननगर, भोसरी, मुळ रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.











