न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. २२ मे २०१९) :- मोशी आळंदी रोडवर डुडुळगाव येथे एक कार उभी आहे. त्यामध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने डुडुळगाव परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेली कार (एमएच १४ एएम ६९५९) पोलिसांनी तपासली असता त्यामध्ये चाळीस लाख रुपये किमतीचा १५० किलो गांजा आढळला.
याबाबत चौकशी केली असता हा सर्व गांजा आरोपींनी विक्री करण्यासाठी आणला असल्याची माहिती मिळाली. संजय मोहन गरड (वय २६, रा. कुकाणा, ता. नेवासा, अहमदनगर), अमोल रामभाऊ आगळे (वय २५), रामभाऊ घनश्याम आगळे (वय ५०, दोघेही रा. कवठा, ता. नेवासा, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.











