न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने भगवान परशुराम व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
संयुक्त जयंतीनिमित्त शुक्रवारी २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सिनेअभिनेते व व्याख्याते योगेश सोमण यांचे ‘‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके ते स्वातंत्र्यवीर सावरकर’’ या विषयावर निगडी प्राधिकरणमधील सावरकर भवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजनात संस्थेचे सरचिटणीस महेश बारसावडे, कार्याध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, उपाध्यक्ष राजन बुडूख, उत्सव समिती प्रमुख सुहास पोफळे, उपक्रम प्रमुख अनंत कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला आहे.











