- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२५) :- शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, देवेंद्र चव्हाण यांना महासंचालक शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे गडचिरोली येथे दोन वर्ष खडतर सेवा बजावलेले पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांना मुबई पोलीस विशेष सेवा पदकाने गौरवण्यात आले. त्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने चिखली येथे नागरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती समिती अध्यक्ष डॉ विजयकुमार पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, संतोष चव्हाण,राजेंद्र कुंवर, सतीश देशमुख, राजेंद्र येळवंडे, राजेश हजारे, बळीराम शेवतें,विजय जगताप,तेजस सकट, महिला दक्षता समिती सदस्य गौरी सरोदे यांची होती. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांना गौरविण्यात आले.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे म्हणाले,”पोलिस दलात दीर्घकाळ व पूर्ण क्षमतेने कायद्याच्या चौकटीत राहून राज्याच्या विविध भागात जनतेची सेवा बजावण्याचे कर्तव्य पार पाडल्याने राज्याच्या पोलीस महासंचालक यांचे वतीने महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते मला व माझे सहकारी देवेंद्र चव्हाण यांना महासंचालक पदकरूपी सन्मान प्रदान करण्यात आला.पोलीस दलात विशेष सेवा निकष व पडताळणी ह्या मुख्य बाबींचा सखोल अभ्यास करूनच अधिकारी कर्मचाऱ्यांची ह्या पदकासाठी निवड होत असते.आज शहरवासीयांच्या वतीने आमचा होत असलेला सन्मान नक्कीच प्रेरणा देणारा आहे”.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” पोलीस आयुक्त विनयकुमार चॊबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस दल वेगाने गती पकडत आहे.शहराची वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात अनेक नागरी समस्यांना प्रशासनास सामोरे जावे लागणार आहे.त्याकरिता अश्या प्रामाणिक व शिस्तप्रिय सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ निरीक्षकांची शहरास आवश्यकता असणार आहे.गुन्हेगारीचा वाढता आलेख आटोक्यात आणन्यासाठी नागरिकांमधील साध्या वेशातील पोलिसांची सुद्धा गरज असणार आहे.त्यामुळे नागरिक व पोलिस यांच्यामधील सुसंवाद वाढणे आवश्यक असणार आहे. पदक प्राप्त पोलीस अधिकारी साळुंखे,चव्हाण, सूर्यवंशी यांच्यामुळे राज्यात पिपरी चिंचवड शहराची मान उंचावली आहे.”
कार्यक्रमास विशेष श्रम मंगेश सकपाळ, ललिता झांबरे, रवींद्र चौधरी,भरत उपाध्ये, मंगेश घाग, देवजी सापरिया, किरण चौधरी, सातप्पा पाटील यांनी घेतले. प्रास्ताविक डॉ विजयकुमार पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन विशाल शेवाळे यांनी केले.











