- जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०७ मे २०२५) :- देहूत अतिउच्चदाब वीज उपकेंद्रासाठी जागा मिळावी, यासाठी वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार यांच्याकडे १९ जानेवारी २०२३ ला अर्ज करून अहवाल पाठविला होता. त्यासाठी विठ्ठलवाडी येथील सरकारी गायरानातील चार हेक्टर जागेची मागणी केली होती.
हवेलीचे प्रांताधिकारी यांनीही अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाली नाही.
देहूतील गायरानातील चार हेक्टर जागा वीज वितरण कंपनीला अतिउच्चदाब वीज उपकेंद्रासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दुबार केली आहे.















