न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. चिंचवड येथील गीतामाता इंग्लिश आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेजने बारावीच्या परीक्षेत ९८.७२ टक्के विक्रमी निकालाची नोंद केली आहे.
विज्ञान शाखेतील सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव आशा पाचपांडे आणि विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे, प्राचार्य डॉ. ललित कनोरे, प्राचार्य अर्चना वेदपाठक, प्राचार्य अपर्णा मोरे, समन्वयक सरिता शिंदे, प्राचार्य कविता उपलंचिवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विभागनिहाय निकाल :
विज्ञान शाखा १०० टक्के निकाल…
तेजस बोबडे (प्रथम) ९३.५०, गौतमी रांगटे (द्वितीय) ९१.१७, सानिका नारखेडे ९०.६७(तृतीय). वाणिज्य शाखा : ९५.४५ टक्के निकाल. आमरीन चौधरी (प्रथम) ८१.६७, हिराराम चौधरी (द्वितीय) ७३.८३, प्रीती जाधव ७३.३३ (तृतीय). कला शाखा : ९० टक्के निकाल. वीणा चौधरी (प्रथम) -८८.३३, नझरीन फातेमा अब्दुल मजीद खान (द्वितीय) – ७४.५०, प्रियांका कोळी – ६०.३३ (तृतीय).
एएसएम सीएसआयटीच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के…
पिंपरीतील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या कॉमर्स, सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्युनिअर कॉलेजने यंदा बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के उत्तीर्ण लागला. झेनब अन्सारी हिने विज्ञान शाखेत ८६ टक्के गुण संपादन करून प्रथम, तर वाणिज्य शाखेतून सौदागर रिहान ८०.३३ टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक मिळवला. श्रेयस पतानी याने विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. सीएसआयटीचे प्राचार्य डॉ. ललित कनोरे, ज्युनियर कॉलेज प्राचार्या अर्चना वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सीएसआयटीचा पूर्णानगर महाविद्यालयाचे यश…
सीएसआयटीच्या पूर्णानगर महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.३४ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८६.९५ टक्के लागला आहे. संस्थेचे संचालक मंडळ आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी : आर्या झांबरे आणि विदुला पालंदे ८४.३३ टक्के, ऋतेश सावंत ८४.१७ तर पार्थ वर्मा याला ८२.३३ टक्के मिळाले आहेत.
वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थी : शिवम दुबे ८३, देवेंद्र गेहलोत ८२.६७ आणि शिबा खान ८०.५० टक्के.