न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 17 मे 2025) :- दापोडी रेल्वे स्थानकाजवळील मुळा नदीत बुडून एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. उल्हास शिंगाडे असे बुडालेल्या मृत तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उल्हास शिंगाडे हा तरुण पाण्याची खोली न कळाल्यामुळे नदीत बुडाला असल्याची माहिती मिळतेय. महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन दलाचे पथक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य करत होते. परंतु अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले.
सकाळी बचावकार्य पुन्हा सुरू झाले आणि बुडालेल्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दापोडी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.