- कोर्टाबाहेर त्यांच्या अंगावर फेकले टोमॅटो…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२५) :- पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरुन राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्यातच, अजित पवारांनी काल पोलिसांना आदेश दिल्यानंतर आज फरार राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
या अटकेनंतर आता भारतीय जनता पार्टी शहर महिला आघाडीच्यावतीने पुण्यातील आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर कोर्ट परिसरात आंदोलन करण्यात आलं आहे. पोलिसांनी अटकेनंतर हगवणे पिता-पुत्राला आज दुपारी न्यायालयात हजर केल.
तत्पूर्वीच भाजप महिला आघाडीने कोर्ट परिसरात धाव घेत हगवणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. यावेळी, महिलांनी आक्रमक होत ज्या गाडीतून हगवणे पिता-पुत्रास कोर्टात आणण्यात आले, तेव्हा त्यांच्या अंगावर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या पिता-पुत्रास २८ मेपर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.











