- माहिती अधिकार कार्यकर्त्यासह व एका पत्रकारावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुरोड (दि. 09 जुन 2025) :- जुने वडिलोपार्जित घराचे बांधकाम करीत असताना कॅन्टोन्मेंटकडे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी तक्रार करण्याची धमकी देत पन्नास हजार रूपये उकळणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता व एका पत्रकारासह दोघांवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक मिंकु मल्होत्रा यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १) राजु मारीमुत्तु रा. देहुरोड, २) चंद्रशेखर पात्रे रा. देहुरोड, ३) रामदास ताठे रा. देहुरोड, ४) बाबु टेकल रा. देहुरोड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने घर जिर्ण झाल्याने फिर्यादी नवीन घराचे काम करीत होते. दरम्यान आरोपीने फिर्यादी यांच्या जुन्या बांधकामाचे ठिकाणी आरोपी क्रं २ ते ४ यांना व्हिडीओ शुटींगसाठी पाठविले. त्यानंतर आरोपी क्रं १ याने फिर्यादी यांना भेटुन लोकांनी तुझ्या बांधकामाचे शुटींग केले आहे. तसेच परवाच सेंट्रल चौक येथे असलेल्या हॉटेल्सवर कारवाई करुन जमिनदोस्त केले आहे. तुझ्यावर देखील तशीच कारवाई करील. तु मला व्हाईट कॉलर समजु नको. मी तुझ्यावर कारवाई करुन तुला संपवुन टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी भितीपोटी त्यांना खंडणी म्हणुन रोख स्वरुपात पन्नास हजार रुपये दिले. सपोनि कदम पुढील तपास करीत आहेत.