- मोठ्या जमावाने डेव्हलपरच कार्यालय फोडलं..
- तब्बल नऊ जण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. 09 जुन 2025) :- हिंजवडी येथे कंपाऊंडमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला गेटवरील सिक्युरिटी गार्डने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यास व आणखी लोकांना जमावाने लोखंडी पहार व लोखंडी कोयता, लाकडी बांबु, दगडाने मारहाण केली.
कंटेनरमधील टिव्ही, टेबल, खुर्चा, सीसीटीव्ही कॅमेरा, लाकडी कपाट, खिडकी व आतमध्ये असलेला पाण्याच्या टँकरचे तोडफोड करुन नुकसान केले आहे.
प्रदिप भिंताडे (धंदा डेव्हलपर्स रा. कासारसाई) यांनी प्रभाकर जांभुळकर व इतर ४० ते ५० जण आरोपी निष्पन्न
१) रोहीत राजेंद्र गायकवाड वय ३१ भिमनगर विश्रांतवाडी, २) विकी प्रभाकर वरतले वय-३६ वर्षे, अपरडेपोजवळ बिबवेवाडी पुणे ३) आकाश अर्जुन झोंबाडे वय-२६ वर्षे, रा. गोकुळनगर पठार वारजे माळवाडी पुणे ४) सागर एकनाथ गायकवाड वय-३५ वर्षे, धंदा. सिक्युरिटी रा. दापोडी जयभीम नगर बापु काटे चाळ ५) नितीश सुरेश सदाफुले वय ३९ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीरा जवळ कोंढवा पुणे ६) रियाज जीवन शेख वय-२४ वर्षे, रा. यशवंतनगर येरवडा पुणे, ७) अनिकेत विलास काळे वय-२५ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. आदर्शनगर काळेवाडी पोलीस चौकीजवळ काळेवाडी पुणे ८) जयेश मनाजी नखाते वय-२५ धंदा बाऊंन्सर नोकरी, रा. धनकुडे वस्ती -बाणेर मुळ गांव वडगांवता. मावळ जि. पुणे९) हितेश अनिल पाटील वय-२१ वर्षे, धंदा. शिक्षण, रा. गरवारे कॉलेज, रा. कोथरुड सुतारदरा यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीना अटक केली आहे.