- शिबिरासाठी चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या वतीने आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२५) :-” रिश्तों मे नई रोशनी ” या फॅमिली शिबिराचे चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या वतीने हॅाटेल ट्री चिंचवड येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तेज ग्यान फाउंडेशन ‘सरश्री‘ यांच्या शिकवणीवर आधारित या शिबिरास 150 हुन जास्त उद्योजकांसह त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लाभला.
हे फॅमिली शिबिर भारतभर गाजलेले आहे. याला सर्वच क्षेत्रामधून मागणी आहे. मुख्यतः कोणत्याही कुटुंबामध्ये सुसंवाद नसल्यामुळेच सर्व अडचणी तयार होत असतात. हा सुसंवाद नेमका कसा करायचा, घरी सर्वांनी मिळून कोणकोणत्या कार्यपद्धती अवलंबवयाच्या याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे या शिबिरामध्ये देण्यात येते. या शिबिरामध्ये शिबिरार्थी यांना फक्त शिकवण्यात येत नाही तर त्याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाकडून कार्यशाळेप्रमाणे प्रॅक्टिकल देखील करण्यात येते म्हणून या शिबिराला खूप चांगला रिझल्ट मिळतो. हे फॅमिली शिबिर हे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत चालले. या फॅमिली शिबिरामध्ये आलेल्या सर्वच कुटुंबीयांनी मनापासून सहभाग घेतला. शिबिरामध्ये असताना एकमेकांमध्ये असलेले समज गैरसमज दूर करत अश्रूंना मोकळी वाट केली. शिबिरातून बाहेर पडताना सर्वांच्या चेहऱ्यावरती जे एक हास्य होते तसेच आपल्या जोडीदाराविषयी, मुलांविषयी प्रेम निर्माण झाले होते हेच या फॅमिली शिबिराचे फलित होते.
या फॅमिली शिबिराचे आयोजन चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक प्रवीण शिंदे, संचालक दत्तात्रय दगडे आदी यांनी केले होते. तेज ग्यान फाउंडेशनकडून सत्यचार्य रविंद्र शेंडे, मानसी वाकेकर, महेश जाधव, गोविंद इंगोले आणि आदी तेजसेवक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी आभार मानले.











