न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बारामती (दि. १९ जुलै २०२५) :- बारामती भिगवण रस्ता येथील बँक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेच्या चीफ मॅनेजरने बँकेतच गळफास घेत गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री आत्महत्या केली. शिवशंकर मित्रा (वय ५२, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे त्यांचे नाव आहे.
मित्रा यांनी आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले. मित्रा यांनी पाच दिवसांपूर्वीच वरिष्ठ कार्यालयाकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली. त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.












