- “राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तब्बल ४२६ तरुणांना नोकरीची संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२५) :- स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळाले. त्यामुळे पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, मा.नगरसेवक अजित गव्हाणे, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, शाम लांडे, फजल शेख, संजय वाबळे, वसंत बोराटे, अनुराधा गोफणे, जितेंद्र ननावरे, प्रकाश सोमवंशी, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, मायला खत्री, बबन गाढवे, शेखर काटे, वर्षा जगताप, चेतन दुधाळ, अक्षय माच्छरे, कविता खराडे, उज्वला ढोरे, मनीषा गटकळ, ज्योती गोफणे, शोभा पगारे, महेश झपके, संजय अवसरमल, श्रीकांत कदम, रवींद्र ओव्हाळ, गोरोबा गुजर, अकबर मुल्ला, रशीद सय्यद, देविदास गोफणे, संपत पाचुंदकर, भरत खरात, शक्रूला पठाण, माऊली मोरे, सतीश लांडगे, युवराज पवार, किरण ढेरे, रोहित कोळेकर, राहुल आडकर, वर्षा शिंदे आदि उपस्थित होते.
सुमारे ३५०० हजार बेरोजगारांनी या महोत्सवात सहभाग घेतला. २ हजार ८४२ हून अधिक पदवीधर युवकांनी ऑनलाईन मुलाखतींसाठी नोंदणी केली, तर १५८८ युवकांनी प्रत्यक्ष मेळाव्यात विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या आहेत. त्याद्वारे ४२६ पदवीधरांना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. बहुतांश उमेदवारांना ‘ऑफर लेटर’ उपलब्ध झाले आहेत. कंपनी व्यवस्थापनांकडून ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आगामी काळात होणार आहेत. विशेष म्हणजे काही उमेदवारांना दोन-दोन ऑफर भेटल्या आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार असून, ज्यांना संधी भेटली त्यांना ३६५ दिवस विविध ठिकाणी असलेल्या रोजगारांच्या संधी मोबाईलवर मिळणार आहेत व त्यांच्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.
दरम्यान संत तुकारामनगर, पिंपरी येथे हॅप्पी स्ट्रीट -झुंबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याशिवाय बी.डी.किल्लेदार उद्यान, स्वर्गीय राजेश बहल उद्यान, PWD मैदान, काळेवाडी, पिंपळेनिलख , इद्रायणीनगर, भोसरी, चिंचवड इंदीरानगर, पिंपळे सौदागर, वाल्हेकरवाडी, एच ए शाळा परिसरात भव्य वृक्षारोपन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॅरम, बुद्धिबळ स्पर्धा, रक्तदान, दंत तपासणी शिबीर, चित्रकला स्पर्धा, इ.१० वी व १२ वी गुणवंताचा सत्कार समारंभ,,शालेय वस्तूंचे वाटप असे विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केल्यामुळे अजित दादांचा वाढदिवस स्वयंपूर्ण उत्साहात साजरा करण्यात आला.












