न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २५ जुलै २०२५) :- आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धानोरे येथे एका इसमाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात कुंडलिक ज्ञानदेव काळे (वय २१, रा. चरोली खुर्द, ता. खेड) यास अटक करण्यात आली आहे.
दि. २३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० ते २४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आळंदी ते मरकळ रोडलगत न्यू हिना हेअर कटींग सलूनजवळ, धानोरे येथे प्रकाश विठोबा भुते (वय ३९, रा. विकासवाडी, पानोरे) यांच्यावर आरोपीने सिमेंटचा ब्लॉक टाकून डोक्यात गंभीर जखम करून हत्या केली.
या प्रकरणी महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून भा.दं.वि. कलम १०३ (१) अंतर्गत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि जाधव अधिक तपास करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.












