न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- पीएमपीच्या प्रवाशांच्या तक्रारी निवारणासाठी राबवण्यात येत असलेली ‘प्रवासी दिन’ ही संकल्पना मध्यंतरी बंद पडली होती. जून महिन्यापासून ‘प्रवासी दिन’ पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवाशांचे गा -हाणे ऐकले जाणार आहे.
प्रवाशांचे मत जाणून घेण्यासाठी बंद पडलेला प्रवासी दिन योजना जून महिन्यापासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना महिन्याच्या पहिल्या शनिवारी पीएमपी आगराच्या आगार प्रमुखाच्या कार्यालयात आपल्या तक्रारी आणि सूचना मांडू शकणार आहेत.
आजघडीला पीएमपी प्रशासनाचा प्रवासी तक्रार निवार विभाग व ई कनेक्ट अॅपवर तक्रार करण्याची सुविधा कार्यरत आहे. मात्र, येथे प्रवाशांकडून जास्त प्रतिसाद मिळत नसल्यामुळे परत प्रवासी दिन सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पीएमपी प्रशानाकडून मिळाली आहे.











