न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर येत्या ३ जूनपर्यंत रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
त्यामुळे आचारसंहितेच्या काळात इलेक्शन ड्युटीमुळे आयुक्तांच्या अनुपस्थितीचा परिणाम आता आणखी आठवडाभर जाणवणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उत्तरप्रदेशात निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.











