न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी सोमवारपासून महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला मोरवाडी येथील कै. देऊबाई कापसे उद्यान समागृहामध्ये सोमवार दि. २७ मे ते १ जून या दरम्यान होणार आहे.
या व्याख्यानमालेमध्ये सोमवारी प्रा. विनय यांचे गांधी विज्ञान या विषयावर व्याख्यान झाले. मंगळवार दि. २८ मे रोजी संदीप बर्वे यांचे सत्याग्रही महात्मा गांधी, बुधवारी दि. २९ मे रोजी राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी या विषयावर डॉ. दिलीप गरुड, गुरुवारी दि. ३० मे रोजी डॉ. शरद जावडेकर यांचे महात्मा गांधीचे शिक्षण विचार, शुक्रवार दि. ३१ मे रोजी महात्मा गांधी आणि अहिंसा या विषयावर प्रा. विकास देशपांडे, शनिवार दि. १ जून रोजी महात्मा गांधी आणि निसर्गोपचार या विषयावर बाळासाहेब सरोदे यांचे व्याख्यान होणार आहे.
तरी या व्याख्यानमालेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बी. आर. माडगूळकर, कार्यवाहक वाय. आर. आपटे, कोषाध्यक्ष पंडित वाणी यांनी केले आहे.











