- तरुणावर कोयत्याने हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी सांगवी दि. 16 ऑगस्ट 2025) :- नवी सांगवी परिसरात विडा पान टपरीसमोर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे.
या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आर्यन ज्ञानदेव गाडेकर (वय १७, रा. नवी सांगवी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी व त्याचा मित्र ईश्वर शिंदे हे विडा पान टपरीवर थांबले असता, आरोपी विनोद तलवारे (१९), अनिकेत अनिलखेडे (२०), प्रणव रोखडे (२०), वेदांत साईल (१९), अविष्कार मोरे (२०), ऋतुपर्ण कडलग (१९), अदित्य सुर्यवंशी (१९) व असित धिवार (१८) यांनी कोयत्यासह त्यांच्यावर हल्ला केला.
वादातून संतापलेल्या आरोपींपैकी एकाने कोयता फिर्यादीकडे रोखून मारहाण केली. इतरांनीही शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी हल्ला करून गाडीचे नुकसान केले. आरोपींनी “आमच्या नादाला लागू नका” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि कलकुटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















