- ६२ वर्षीय ज्येष्ठाची १५ लाखांची फसवणूक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड दि. 16 ऑगस्ट 2025) :- ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच चिंचवड परिसरात ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १५ लाख ३३ हजार ७५० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत पीडित व्यक्तीला मोबाईल क्रमांकवरून व्हॉट्सअॅप संदेश पाठविण्यात आला. या संदेशात लाईफ इन्शुरन्स कंपनीचा हप्ता भरण्यास सांगण्यात आले.
आरोपींनी फिर्यादीस विश्वासात घेऊन बँकेच्या खाते क्रमांकामध्ये आरटीजीएसद्वारे रक्कम भरण्यास भाग पाडले. या दरम्यान फिर्यादीकडून दोन वेळा व्यवहार करून एकूण ₹१५,३३,७५०/- इतकी रक्कम जमा करून घेतली.
फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी मोबाईल क्रमांक व संबंधित बँक खात्याचा धारक सुनिल कुमार याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसून, पुढील तपास पोनि मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















