- मग भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता पुन्हा जात्यात?..
- स्वीकृतपदाच्या ‘लॉबिंग’मुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीआधीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणुकीत आयात उमेदवारांना प्राधान्य देत निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना पक्षात असताना आता स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातूनही त्याच आयात नेत्यांना संधी दिली जाणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मान ठेवला जाणार? असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्यात आली असून, संख्याबळानुसार भाजपला सात तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला तीन जागा मिळणार आहेत. भाजपकडे ८४ नगरसेवकांचे बहुमत आहे. या नियुक्त्यांमध्ये पराभूत उमेदवारांना संधी देऊ नये, असा सूर पक्षांतर्गत चर्चेतून पुढे येत आहे.
स्वीकृत पदांच्या ‘लॉबिंग’मुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून, यंदाही भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता जात्यात की सुपात? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.












